शाहीन बागेतील आंदोलक मरत कसे नाही, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

652

शाहीन बागेतील आंदोलकांचा मृत्यू कसा होत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य पश्चिम बंगालमधील भाजप नेते दिलीप घोष यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेत्यांनी वादग्रस्त विधानं करण्याची मालिकाच सुरू केली आहे. अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा, राहुल सिन्हा आता त्यात दिलीप घोष यांची भर पडली आहे.

बंगालमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना दिलीप घोष म्हणाले की, “ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की नोटाबंदीच्या काळात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. मग आता शाहीन बागेत 3 ते 4 डीग्री तापमान असताना आंदोलक मेले का नाही? नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात अनेक महिला आणि बालकं दिल्लीच्या थंडीत खुल्या आकाशाखाली आंदोलन करत आहेत. त्यांना कुठलाच आजार कसा नाही झाला याचे आश्चर्य वाटत आहे. एकाही आंदोलनकर्त्यांचा मृत्यू नाही झाला. त्यांनी काय अमृत प्राषण केले की काय? परंतु काही लोकांनी घाबरून आत्महत्या केल्याचा दावा बंगालमध्ये केला आहे.”

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गोली मारो गद्दारोंको अशा घोषणा दिल्या होत्या. तर प्रवेश वर्मा यांनी शाहीन बागवाले तुमच्या मुली बहिणींवर बलात्कार करतील असे वादग्रस्त विधान केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या