माजी नगरसेविका शाहिदा खान यांचे निधन

प्रभाग क्रमांक 64 च्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शाहिदा हारुण खान यांचे आज शुक्रवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघेल. अंधेरी येथील आंबोली वॉर्डात लॉकडाऊनच्या काळात शाहिदा खान यांनी अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना तसेच नागरिकांना मदत केली होती. सातत्याने गरीब आणि गरजुंच्या मदतीसाठी धावणारी समाजसेविका काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.