दिल्ली हिंसाचार प्रकरणी शाहरूखला अटक ?

6891

सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत जनक्षोभाचा भडका उडाला आहे. सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या दगडफेक आणि गोळीबारात किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांचाही समावेश आहे. या हिंसाचारात एका व्यक्तीने 8 गोळ्या झाडल्या होत्या. या गोळ्या झाडणाऱ्याची ओळख पटली असून त्याचे नाव शाहरूख आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.

delhi-violence-shahrukh

काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार लाल रंगाचा टीशर्ट घातलेल्या एका तरुणाने पोलिसांसमोर गोळीबार केला होता. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. या व्यक्तीची पोलिसांनी ओळख पटवली असून त्याचे नाव शाहरूख असल्याचे कळते आहे.

delhi-violence-shahrukh-wit

पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो तरूण थांबला नाही आणि त्याने गोळीबार करणं सुरूच ठेवलं. माध्यमांनी दाखवलेल्या व्हिडीओमध्ये हा तरूण पोलिसांच्या देशेने धावत जाताना दिसला होता.

delhi-violence-mob

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचार प्रकरणी तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीसाठी हिंसाचार सुरू असलेल्या भागातील सगळे आमदार आणि अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. दिल्लीतील तणावाचे वातावरण सलग तिसऱ्या दिवशीही कायम असून ब्रम्हपुरी भागामध्ये सकाळी दगडफेक झाली आहे. इते शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या अग्निशमन दलाच्या संचालकांनी सांगितले आहे की त्यांच्या एका गाडीला हिंसाचारात सहभागी असलेल्यांनी पेटवून दिले आहे. काल रात्रीपासून मंगळवारी पहाटे 3 वाजेपर्यंत अग्निशमन दलाला आग लागल्याचे एकूण 45 फोन आले होते असेही त्यांनी सांगितले.

delhi-vioelnce-khajuri-poli

या हिंसाचारामध्ये शहादराचे डीसीपी अमित शर्मा यांच्यासह 37 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने पेट्रोल पंप, पोलीस व्हॅनसह अनेक गाडय़ा जाळल्या. या हिंसाचारामुळे पोलिसांनी 10 भागांमध्ये जमावबंदी लागू केली होती. परिसरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती आणि दिल्लीतील बोर्ड परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या