निरामय – चांगल्या सवयी

>> शमिका कुलकर्णी, (आहारतज्ञ)

काही कारणास्तव आपल्या रोजच्या आहारात थोडफार बदल झाला की सारे रुटीनच बदलते. उदा. अतिरिक्त साखर, अनावश्यक कर्बोदके, जास्त स्टार्च घातलेले पदार्थ आहारात शिरकाव करतात आणि मग हे पदार्थ आपल्या सवयीचे होऊन जातात. अशा चुकीच्या सवयींवर मात करून चांगल्या सवयी लावून घेऊया.

– पाण्याचा योग्य समावेश – उन्हाळ्यापासून शरीराला वाचवण्यासाठी आणि इतर शरीराच्या तक्रारी टाळण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. मग साधे पाणी असो किंवा साखरविरहित पेये असोत, जसे ग्रीन टी, ताक, नारळपाणी, लिंबूपाणी.
– घरगुती आहार – सध्या कामानिमित्त किंवा इतर कारणांमुळे अनेक जण बाहेरचे खाद्यपदार्थ वरच्यावर खातात. हे कमी करून जास्तीत जास्त घरगुती पदार्थ खावेत आणि निरोगी राहावे.
– व्यायाम – झेपेल तितका आणि बेताचा व्यायाम आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून नियमित व्यायामाचा कोणताही प्रकार आत्मसात करावा.
– झोप – हल्ली टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर किंवा कामानिमित्त अनेक जण रात्री उशिराने झोपतात. ही सवय आरोग्याला अतिशय घातक आहे. त्यामुळे नियमित वेळेत झोपण्याची सवय करणे खूप गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या