राममंदिर शिलान्यास स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । प्रयागराज

राममंदिराचा 21 फेब्रुवारीचा नियोजित शिलान्यास आणि त्यासाठी अयोध्येकडे कूच करण्याचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे. शिलान्यासाचा नवा मुहूर्त नंतर निश्चित करून जाहीर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात युद्धासारखे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आजची वेळ ही दहशतवादाविरोधात लढण्याची आहे. त्यामुळे राममंदिराचा शिलान्यास आणि ‘चलो अयोध्या’चा कार्यक्रम लांबणीवर टाकणे भाग पडले, असे शंकराचार्यांनी सांगितले.