शरद कारखाना प्रशासनाकडून ऊसतोड मजुरांची त्यांच्या जिल्ह्यात रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊस गळीत हंगाम संपला असतानाही लॉकडाऊनमुळे कारखाना परिसरामध्ये अडकून पडलेल्या 12 जिल्ह्यांमधील 738 मजुरांची सोमवारी (नंरदे, ता.हातकणंगले) येथील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शरद कारखाना प्रशासनाने जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करून त्यांच्या जिल्ह्यामध्ये रवानगी केली आहे.

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बसेस, आयशर टेम्पो, ट्रक्स अशा वाहनांमधून ऊसतोड मजूर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला त्यांच्या गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली. बीड, परभणी, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, नगर, बुलढाणा, हिंगोली, वाशिम व यवतमाळ अशा 12 जिल्ह्यातील मजूर यावेळी आपआपल्या गावी जाण्यासाठी रवाना झाले. आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे,शेती अधिकारी दीपक पाटील व कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.आवटी यांनी याचे नियोजन केले.