मंत्रीपद मिळूनही काही करता येत नसेल तर बांगड्या भरा, शरद पवारांचा पाचपुतेंना टोला

1225

महाराष्ट्रात अनेकांना मंत्री करण्याची भूमिका मी घेतली. एखाद्या व्यक्तीला 13 वर्षे मंत्रीपद मिळूनही काही करता येत नसेल तर बांगड्या भरल्या पाहिजेत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बबनराव पाचपुते यांना लगावला आहे.

श्रीगोंदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी माजी मंत्री आणि भाजप उमेदवार बबनराव पाचपुते यांना टीकेचे लक्ष्य केले. पाचपुते यांना मी रयत शिक्षण संस्थेत सदस्य केले. तेथे बसून फक्त त्यांनी राजकारण करायचेच काम केले. त्यांना वनमंत्री, आदिवासी मंत्री केले, पण पाचपुते हे बिनकामाचे मंत्री निघाले, अशी टीका पवार यांनी केली.

ज्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आजच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडली होती त्या लोकांनाच फडणवीस आज जवळ करत आहेत. ज्यांनी ऊस उत्पादकांचे, कामगारांचे पैसे थकवले आहेत त्यांना लोकांनी त्यांना धडा शिककाका, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या