
रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी माहिती दिली की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपचारांना प्रतिसाद दिला असून त्यांची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली आहे.
ज्या तीव्र प्रकृती बिघडण्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्या अवस्थेतून ते पूर्णपणे बरे झाले असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आरोग्य स्थिती समाधानकारक आहे.
पूर्णपणे बरे झाल्याने शरद पवार यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा आणि हळूहळू दैनंदिन कामकाज सुरू करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Dr Simon Grant, Physician and Trustee, Ruby Hall Clinic, stated that CP-SCP chief Sharad Pawar has responded excellently to treatment and has now fully recovered from the acute episode that led to his admission. In view of his complete recovery and stable health status, Mr Pawar… pic.twitter.com/7HvECp3n7d
— ANI (@ANI) February 13, 2026



























































