शरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

1621
sharad-pawar-uddhav-thackeray

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात भेट घेतली आणि चर्चा केली. राज्यातील विविध प्रश्नांवर या दोन नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.  यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

राज्य सरकार सर्व शक्तिनिशी कोरोनाशी लढत आहे. अनलॉकचे पर्व सुरू झाले आहे. मात्र काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. तसेच अनलॉक काळात अर्थचक्राला अधिक गती देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. यासह राज्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत या दोन नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या