मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढता येईल, शरद पवार यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाला राजकारण करायचे आहे. मराठा आरक्षणप्रकरणी आम्हाला राजकारण करायचे नाही असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अध्यादेश काढला तर आंदोलन होणार नाही अशी भूमिका आज मांडली. मराठा आरक्षणप्रकरणी पवारांनी राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांवर हल्लाबोल केला.

माझ्या माहितीप्रमाणे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश आणू शकते तसेच पेâरविचार याचिका दाखल करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. आम्हाला मराठा आरक्षणप्रकरणी राजकारण करायचे नाही तर विद्याथ्र्यांना दिलासा द्यायचा आहे. काहींना मराठा समाजात प्रक्षोभ वाढावा असे वाटत असेल, असा टोलाही पवारांनी यावेळी भाजपचे नाव न घेता लगावला. मराठा आरक्षणावरून केंद्र-राज्य असा दोन सरकारांमध्ये वाद व्हायला नको अशी सामंजस्याची भूमिकाही त्यांनी मांडली. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही पवारांनी यावेळी नमूद केले.

अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यावरील कारवाई मुंबई महापालिकेने केली आहे. पालिकेचे काही नियम असून त्यानुसार ते कारवाई करत असतात. कारवाईचा निर्णय सरकारचा नाही तर पालिकेचा आहे. सर्व जबाबदारी पालिकेची आहे, असेही शरद पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

एसआयटीची चाचपणी
कोरेगाव-भीमाप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याबाबत चाचपणी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत बैठक झाली असे सांगत पवारांनी याप्रकरणी अधिक भाष्य करणे टाळले.