समाजातील मागे राहिलेल्या घटकांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही; शरद पवार यांचे मत

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. त्यात समाजातील आरक्षण, मागे राहिलेल्या घटकांकडे लक्ष देत त्यांनाही योग्य संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. काही जणांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात वर्षभरात पाच ते सहा ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आपण लोकशाहीचा ठेवा जतन करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण जनतेपर्यंत पोहचणार आहोत.

दलित वर्गात अनेक समाज आहेत. संख्येचा विचार करता मातंग समजाचा विचार करावा लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा संदेश दिला. त्यांनी शिक्षणाबाबतची भूमिका मांडली. त्याची नोंद समाजातील काही घटकांनी घेतली. त्यामुळए त्या वर्गात शिक्षणाचे प्रमाण चांगले आहे. आता या समाजातही शिक्षण रुजवण्याची गरज आहे.

धनगर, वंजारी आणि इतर जातींचे आरक्षण आहे. त्यामुळे शिक्षण, स्पर्धा परीक्षा या ठिकाणी मर्यादीत जागा असतात. अशा परिस्थितीत इतर जातीचा समावेश झाला. तर इतर जातींची परिस्थिती चिंताजनक होते. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेत त्या जागेत अ,ब,क,ड असे विभाग करत जो घटक मागे राहिला आहे, त्याला जागा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचा फायदा आता मागे राहिलेल्या घटकांना होत आहे. त्यामुळे 100 पैकी 20 ते 22 डॉक्टर धनगर समजातील होत आहे. याचे समाधान आहे. मात्र, इतर घटक मागे राहिले आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

अशा अनेक समस्या आहेत. त्यांचा आढावा घेत योग्य ठिकाणी त्या मांडत सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.