शिवसेनेच्या मागणीत काहीच गैर नाही!

3398
sharad-pawar-new1

महाराष्ट्राच्या सत्तेत 50- 50 टक्के वाटा आणि मुख्यमंत्री पद मिळावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सरकार चालविण्याचा अनुभव असल्याने शिवसेनेच्या मागणीत काहीच चुकीचे नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

भाजपने शिवसेनेबरोबर युती करून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाताना 220 जागा गाठण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण त्यांना ते गाठता आलेले नाही, भाजपचे संख्याबळ 122 वरून 105 वर आले आहे. सत्तेच्या समसमान वाटपाबाबत उद्धव ठाकरे यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करून दिलेली आठवण चुकीची नसल्याचे मत शरद पवार यांनी राज्यातील राजकीय स्थितीबाबत बोलताना व्यक्त केले. मागच्या वेळी शिवसेनेच्या चार-दोन गोष्टी राहून गेल्या. मात्र, या वेळी ते काही सहन करतील, असे दिसत नाही. स्कतःचा आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल, असेही पवार म्हणाले.

सरकार चालविण्याचा अनुभव शिवसेनेच्या गाठीशी
राज्यात 1995 ते 1999 या काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यामुळे  सरकार चालविण्याचा चांगलाच अनुभव शिवसेनेच्या गाठीशी असल्याने त्यांच्या मागणीत काहीच गैर नाही, असे पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या