
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांनी व्हिलचेअरवर बसून शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शरद पवार यांच्यासोबत पश्चिम बंगाल, ओडिसा आणि तामिळनाडू या राज्यांमधून निवडून आलेल्या इतर खासदारांनीही शपथ घेतली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, डीएमकेचे तिरुची शिवा, भाजपचे रामराव वडकुते, मनमोहन सामल, बीजेडीचे संतृप्त मिश्रा, बीजेडी-काँग्रेस पुरस्कृत दिलीप कुमार राय, डीएमकेचे कॉन्स्टँटाइन रवींद्रन, डीएमडीएलचे एल.के. सुधीश आणि काँग्रेसचे ख्रिस्तोफर मणिकम यांच्यासह एकूण 19 नेत्यांनी आज खासदारकीची शपथ घेतली.
Delhi | MPs elected to the Rajya Sabha from West Bengal, Odisha, Tamil Nadu, and West Bengal took oath as Rajya Sabha members
Leaders, including NCP-SCP chief Sharad Pawar, Union Minister Ramdas Athawale, and DMK’s Tiruchi Siva, took oath.
(Source: Sansad TV) pic.twitter.com/Sflz4veFRa
— ANI (@ANI) April 6, 2026
शरद पवार हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. लोकसभेतील प्रदीर्घ कारकिर्दीनंतर शरद पवार 2014 मध्ये प्रथमच राज्यसभेवर निवडून आले होते. शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे या देखील लोकसभेमध्ये खासदार आहेत. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. तसेच शरद पवार यांचा पुतण्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे देखील राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेमध्ये दिसणार आहेत.



























































