
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक महत्त्वाचं आणि अत्यंत सूचक वक्तव्य करत पक्षात बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत बदलांच्या चर्चांना उधाण आले असून आता राज्याचे लक्ष राष्ट्रवादीतील बदलांकडे लागले आहे.
ટभाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. म्हणून भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. आता नक्की वेळ आलेली आहे. विलंब करून चालणार नाही आणि ते काम पक्षामध्ये करण्याचा आग्रह मी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडे करीन एवढं मी सांगू इच्छितो, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पक्षातील 40 आमदारांच्या सह्या घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अजित पवार यांनीच स्वत: पुढे येत यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले होते. तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहोत, कुठेही जाणार नाही, अशी भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दात मांडली होती.




























































