शेअर इट भाग १५- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

319
mumbai share market

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)

डीसीबी बँक :-DCB Bank Ltd

सध्याची किंमत :- रुपये १७९
कंपनी बद्दल थोडक्यात माहिती:१९३० साली मुंबईमध्ये इस्माईलिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मसालावाला सहकारी बँकेच्या विलीनीकरणानंतर डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक झाली, जिचे नाव सध्या डेव्हलपमेंट क्रेडिट बँक असं आहे. डीसीबी बँक लिमिटेड ही व्यक्ती, लहान व मध्यम उद्योग, ग्रामीण बँकिंग आणि मध्य कार्पोरेट्सना उत्पादने ऑफर करते. २०१६-१७ या आर्थिक वर्षी कंपनीने २१% नफा नोंदिवला आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत (१-२ वर्ष):-रुपये २४५

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड :- HPCL

सध्याची किंमत :- रुपये ३०६/-

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- HPCL ही ५०० कंपनीच्या यादीत स्थान असलेली कंपनी. पेट्रोल आणि ऑइल क्षेत्रात मोलाची कामगिरी बजवात आहे हिदुस्थानीय सरकार चा ५१% वाटा या कंपनीत आहे. हिंदुस्थानात झपाटीने वाढणाऱ्या कमाईच्या बळावर तरुणाई दुचाकी आणि चारचाकीची विक्रमी विक्री होत आहे आणि साहजिकच यात HPCL च्या ग्राहकांची संख्या वाढीस मदत होईल. हिंदुस्थानातील अग्रगण्य कंपनी ONGC या कंपनीला आपल्या पंखाखाली घेत आहे आणि यासाठी सरकारची मंजुरीही मिळाली आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत(१- २ वर्ष) :- रुपये ४५०/-

कॅनफिनहोम्स:- Can Fin Homes

सध्याची किंमत :- रुपये ३५४/-

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती:- कॅनफिन होम्स ही कॅनरा बँकने १९८७ला स्थापित केलेली कंपनी आहे. प्रत्येकाला स्वतःचं घर असावं हे स्वप्न असते. त्यासाठी लागणारे गृहकर्ज देणे हे कॅनफिन होम्स कंपनीचे मुख्य काम आहे. १३० ब्रँचचं जाळं संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेलं आहे. कॅन फिन होम ही इतर प्रकारचे कर्ज सुद्धा देते.

भविष्यातील अंदाजित किंमत (१- २ वर्ष) :- रुपये ५२५/-

आपली प्रतिक्रिया द्या