शेअर इट भाग १६- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

219
mumbai share market

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)

कोटक महिंद्रा बँक:- Kotak Mahindra Bank

सध्याची किंमत-१३१२

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती :-कोटक महिंद्रा बँक ही २००३ साली अस्तित्वात आली. २०१५ साली आयनजी वैश्य बँकला आधिग्रहित केले. कोटक महिंद्रा बँक ही खासगी क्षेत्रात मार्केट कॅपिटलिजेशनमध्ये दुसऱ्या क्रमांकवर आहे. १२०० हून अधिक शाखा असलेली बँक आहे. कॉर्पोरेट आणि किरकोळ ग्राहकांसाठी बँकिंग आणि आर्थिक सेवा पुरवते.
भविष्यातील अंदाजित किंमत (१-२ वर्ष) :- रुपये १६००

आयसीसीआय लोम्बार्ड :- ICICI Lombard

सध्याची किंमत :- रुपये ७२६

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती :- आयसीसीआय २००१ सालापासून इन्शुरन्स या व्यवसायामध्ये आहे. २०१७ साली त्यांनी राष्ट्रीय स्टॉक मार्केटमध्ये प्रेवेश केला. ही सर्व प्रकारचे इन्शुरन्स प्रॉडक्ट पुरवते. आयसीसीआय लोम्बार्ड मध्ये आयसीसीआय बँकची ६४% आणि फॅर्फफॅक्स या कंपनीची ३६% भागीदारी आहे.आयसीसीआय लोम्बार्ड ही खासगी क्षेत्रात एक खूप नामांकित कंपनी आहे. इन्शुरन्स क्षेत्रात ८.४% मार्केट शेअर हा आयसीसीआय लोम्बार्डचा आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत(१- २) वर्ष :- ९५०

हिरो मोटोकॉर्प :- Hero Moto Corp

सध्याची किंमत :- रुपये ३६४१

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती :- हिरो मोटोकॉर्प म्हणजे आदीची हिरो होंडा. या कंपनीची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. हिंदुस्थानातच नव्हे तर जगात नावाजलेली कंपनी आहे आहे. दुचाकी या क्षेत्रात ४६% इतका भाग हा हिरो मोटोकॉर्प चा आहे.२०१७ साली ४००० कोटी नफा नोंदवला आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत(१- २) वर्ष :- ५०००

आपली प्रतिक्रिया द्या