
शेअर बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली. जागतिक बाजारात असलेल्या तेजीचा ट्रेंड देशातही दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 428 अंकांची झेप घेत बाजार 41.009.71 अंकांवर बंद झाला. कामकाजाच्या वेळेत निर्देशांक 41,055.80 वर पोहचला होता. तर निफ्टीच्या निर्देशांकाने 114.90 झेप घेत बाजार बंद होण्याच्यावेळी तो 12,086.70 वर पोहचला होता. तर दिवसभराच्या कामकाजात निर्देशांक 12,098.85 वर पोहचला होता.
Sensex rallies 428 points to end at 41,009.71; Nifty settles near 12,100
— Press Trust of India (@PTI_News) December 13, 2019
जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे बाजार तेजीत आला आहे. अमेरिका-चीनमध्ये पहिल्या टप्प्यातील व्यापार करारावर सहमती झाली आहे. त्यामुळे व्यापारयुद्ध थांबण्याचे संकेत असल्याने जागतिक बाजारातही तेजी आहे. मुंबई शेअर बाजारातील 30 पेकी 24 तर निफ्टीतील 50 पैकी 38 शेअर तेजीत होते. निफ्टीतील 11 क्षेत्रातील 10 क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी होती. फार्मा क्षेत्रातील शेअरमध्ये मंदी होती. अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली तर वेदांतामध्ये 3.8 टक्के वाढ दिसून आली. डॉ. रेड्डीच्या शेअरमध्ये 2.8 टक्क्यांनी तर भारती एअरटेलमध्ये 2 टक्क्यांची घट दिसून आली.
























































