
आठवडाभराच्या घरसणीनंतर बुधवारी शेअर बाजार काही प्रमाणात सावरला आहे. बुधवारी बाजराची सुरूवात तेजीत झाली. बाजार संपेपर्यंत चढउतार होत बाजार तेजीतच बंद झाला. बँकिंग आणि ऑटो सेक्टरचे शेअर तेजीत होते. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 620 आणि निफ्टी 183 अंकाची वाढ नोंदवत बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी 57,365.85 अंकावर सुरू झाला. दिवसभरात बाजारात चढउतार सुरू होते. मात्र, बँकिंग आणि ऑटो सेक्टरचे शेअर तेजीत होते. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 57,846.45 अंकापर्यंत पोहचला होता. तर त्यात 57,346.78 अंकापर्यंत घसरण झाली. बाजार संपेपर्यंत निर्देशांकात 619.92 अंकांची वाढ होत तो 57,684.79 अंकापर्य पोहचला होता. तर मंगळवारी बाजाराच्या निर्देशांकात 195 अकांची घसरण होत तो 57,064.87 अकांवर बंद झाला होता.
निफ्टीचा निर्दशांकही तेजीत होता. त्यात जास्त चढउतार झाले नाहीत. बाजाराची सुरुवात 17,104.40 अकांवर झाली. बाजराने 17,213.05 अकांचा उच्च्यांक नोंदवला. तर निर्देशांक 17,064.25 अकांपर्यंत घसरला होता. बाजार बंद होईपर्यंत 183.70 अकांची वाढ नोंदवत बाजार 17,166.90 अकांवर बंद झाला. मंगळवारी बाजाराने 70 अंकांची घसरण नोंदवत 16,983 अकांवर बंद झाला होता.
बुधवारी बाजारात बँकिंग आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी होती. या सेक्टरमधील सर्वच सेक्टर तेजीत होते. इंडिसइंड बँकेने 5.73 टक्क्यांची वाढ नोंदवली. तसेच अॅक्सिस आणि एसबीआयचे सेक्टरही तेजीत होते. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज फिनसर्व, बजाज फाइनान्स आणि एचडीएफसी बँकेचे शेअरही तेजीत होते. ऑटो सेक्टरमध्ये मारुति सुजुकी, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नोलॉजी, टीसीएसच्या शेअरनेही वाढ नोंदवली.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे गुंतवणूकदार सावधानता बाळगत आहे. गुंतवणूकदार सुरक्षितस्थळी पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे बाजारात काही दिवसांपासून घसरण दिसून आली होती. मात्र, काही दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी बाजार थोडा सावरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराकडून सकारात्मक संकेत मिळत असल्याने बाजार बुधवारी सावरला आहे.
































































