Share Market Crash – टॅरिफ बॉम्बच्या भीतीनं शेअर बाजार धडाम; सेन्सेक्स-निफ्टी कोसळला, गुंतवणूकदारांचे नुकसान

हिंदुस्थानी आयातीवर अमेरिकेने लादलेला 50 टक्के टॅरिफ बुधवारपासून लागू होणार आहे. याचा प्रभाव शेअर बाजारावर दिसून येत असून मंगळवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळला. पहिल्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स 629 अकांनी, तर निफ्टी 200 हून अधिक अंकांनी खाली आला. जवळपास सर्वच शेअर लाल भडक झाले असून यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीवर दबाव दिसून आला. अवघ्या अर्ध्या तासात सेन्सेक्स 630 अकांनी कोसळला आणि 81 हजारांच्याही खाली आला. याचा प्रभाव निफ्टीवरही पडला आणि निफ्टी 200 अंकांनी पडून 24763 वर पोहोचला.

ट्रम्प टॅरिफच्या भीतीने शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांचे शेअर कोसळले. लार्ज कॅप कॅटगिरीतील सनफार्माचा शेअर 2.56 टक्के, अदानी पोर्टचा शेअर 1.80 टक्के, टाटा स्टीलचा शेअर 1.60 टक्के, टाटा मोटर्सचा शेअर 1.10 टक्क्यांनी खाली आला.

थोडं सहन करू, पण अमेरिकेच्या टॅरिफ दबावाला बळी पडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मिडकॅप कॅटगिरीतील पीईएल शेअर 2.82 टक्के, एनक्यूरचा शेअर 2.65 टक्के, भारत फोर्जचा शेअर 2.54 टक्के, माजगाव डॉकचा शेअर 2.48 टक्के खाली आला. स्मॉलकॅपमधील KITEX चा शेअर 4.99 टक्के, Praveg चा शेअर 4.80 टक्क्यांनी खाली आला.

जागतिक बाजारातही अस्थिरता असल्याने 1207 कंपन्यांच्या शेअर्सने घसरणीने सुरुवात केली, तर 1036 कंपन्यांमध्ये किरकोळ वाढ दिसून आली, 151 कंपन्यांचे शेअर फ्लॅट ओपन झाले. यात कोणत्याही प्रकारचा बदल दिसला नाही.

आता देवाक काळजी; उद्यापासून अमेरिकेचा 50 टक्के टॅरिफ बॉम्ब, कशा कशावर होणार परिणाम