
अमेरिकेने हिंदुस्थानवरील टॅरिफ दुपटीने वाढवून तो 50 टक्के केला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. पहिल्या सत्राच बाजारात मोठी घसरण झाली. मात्र, काल विकली एक्सापरी असल्याने दुसऱ्या टप्प्यात शेवटच्या एका तासात बाजारात प्रचंड तेजी आली. बाजाराने दिवसभरातील सर्व घसरण रिकव्हर करत बाजार थोड्यात तेजीत बंद झाला. त्यामुळे शुक्रवारी बाजाराकडून गुंचवणूकदारांना मोठ्या आशा होत्या. मात्र, त्यावर पाणी फेरले गेले आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम शुक्रवारीही शेअर बाजारावर दिसून येत आहे. बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 502 अंकांच्या घसरणीसह 80,0120 वर व्यवहार करत आहेत. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 145 अंकांच्या घसरणीसह 24,450 वर व्यवहार करत आहे.
बुधवारी बाजारात पहिल्या सत्रातील घसरण आणि दुसऱ्या सत्रातील तेजी यामुळे शुक्रवारी बाजाराची दिशा ठरणार होती. मात्र, शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात ढेपाळतच झाली. त्यामुळे बाजारात दबाव आणि लिक्विडिची कमतरता जाणवत आहे. सेन्सेक्स 145 अंकांच्या घसरणीसह 80,478वर उघडला. तर, निफ्टी 51 अंकांच्या घसरणीसह 24,544 च्या पातळीवर केला. त्यानंतर या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घ्यावी आणि हेज पोझिशन राखावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
देशाच्या शेअर बाजारासह जगातही टॅरिफचा परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेत नॅस्डॅक विक्रमी उच्चांकावर बंद झाला. शुक्रवारी आशियाई बाजारपेठांमध्ये मिश्र व्यवहार दिसून आले. जपानचा टॉपिक्सने सर्वकालीन उच्चांक गाठला. जपानचा निक्केई 225.93 टक्क्यांनी वधारला, तर टॉपिक्स निर्देशांक 1.42 टक्क्यांनी वधारला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 0.25 टक्क्यांनी आणि कोस्डॅक 0.65 टक्क्यांनी वधारला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक फ्युचर्स कमकुवत सुरुवात दर्शवत होता.
या घडामोडींच्या परिणाम सोन्याच्या दरावरही दिसून येत आहे. अमेरिका एक किलो सोन्याच्या बारच्या आयातीवर शुल्क लादणार असल्याच्या वृत्तानंतर सोन्याच्या भावांनी नवीन उच्चांक गाठला. सोन्याच्या भावांनी 23 जुलैपासूनचा नवा उच्चांक गाठला. स्पॉट गोल्डच्या भावात 0.2 टक्क्यांनी घट होऊन ते प्रति औंस 3,389.37 डॉलरवर पोहोचले. या आठवड्यात आतापर्यंत बुलियनमध्ये 0.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूएस गोल्ड फ्युचर्स 3,534.10 डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्यानंतर 1.6 टक्क्यांनी वाढून 3,509.10 डॉलरवर पोहोचले.
कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होत्या परंतु जूनच्या अखेरीपासून त्यांच्या सर्वात तीव्र साप्ताहिक तोट्याकडे वाटचाल करत होत्या. ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.05 टक्क्यांनी वाढून 66.46 डॉलरप्रति बॅरलवर पोहोचले, जे आठवड्या-दर-आठवड्यातील 4 टक्क्यांहून अधिक घसरणीच्या मार्गावर आहे. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्युचर्स 63.88 डॉलर प्रति बॅरलवर स्थिर होते.