
केंद्र सरकारने जीएसटीमध्ये सुधारणा केल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. बाजार उघडताच सेन्सेक्स 266 अंकांनी वाढून 80,982 वर पोहोचला, तर निफ्टीतही 69 अंकांची वाढ होऊन तो 24803 वर पोहोचला. बँक निफ्टीत नाममात्र 89 अंकांची वाढ नोंदवण्यात आले.
बीएसईवर लिस्ट 30 शेअररपैकी फक्त 2 शेअर लाल होते, तर इतर शेअर वधारले आहेत. महिंद्र अँड महिंद्रा, एशिन पेंट्स, पॉवर ग्रीड, रिलायन्स सारखे शेअरमध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ दिसली. ऑटो, एमएमसीजी आणि बँकेचे शेअरही वाढल्याचे दिसले.
दरम्यान, मार्केटमध्ये तेजी दिसून आल्याने अनेक आयपीओही बाजारात येत आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी असणार आहे. सध्या अर्बन कंपनी, डेव एक्सलेटर, श्रृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र आणि ऑस्टर सिस्टम्स या कंपनीचे आयपीओ लिस्ट होणार आहेत.
अर्बन कंपनी – ही कंपनी आयपीओतून 1900 कोटी उभारणार आहे. 10 ते 12 सप्टेंबर या काळात यात गुंतवणूक करता येईल. 98 ते 103 ही शेअरची किंमत आहे.
डेव एक्सलेटर – ही कंपनी 1433 कोटी रुपये उभारत असून 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान गुंतवणूक करता येईल. शेअरची किंमत 56 ते 61 असणार आहे.
श्रृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र – ही कंपनी 401 कोटी उभारत असून शेअरची किंमत 155 ते 165 आहे. 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असेल.
ऑस्टर सिस्टम्स – ही कंपनी आयपीओतून 1.5.57 कोटी उभारत आहे. 8 सप्टेंबर पर्यंत यात गुंतवणुकीची संधी असून शेअर किंमत 52 ते 55 दरम्यान आहे.