शेअर बाजार आज पुन्हा एकदा नव्या उच्चांकावर पोहोचला. सेन्सेक्स 69,888 लेवलवर पोहोचला, तर निफ्टी 21,000 लेवलवर पोहोचले आहे. याआधी 6 डिसेंबरला सेन्सेक्स ऑलटाइम हाय 69,744.62 वर होते. तर निफ्टी ऑलटाइम हाय 20,961.95 वर होते. सेन्सेक्स आज 147 अंकांची झेप घेत 69,669 स्तरावर व्यापार करीत आहे, तर निफ्टीसुद्धा 22 अंकांच्या वाढीसह 20,923 स्तरावर व्यापार करीत आहे. सेन्सेक्सच्या 30 शेअरपैकी 16 शेअर वाढले असून 14 शेअरमध्ये घसरण झाली आहे. सेन्सेक्सच्या टॉप गेनर्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील आणि एचसीएल टेक आहे. तर घसरलेल्या शेअरमध्ये एम ऍण्ड एम, टाटा मोटर्स, एअरटेल, बजाज फायनान्स शेअर्सचा समावेश आहे.
यूपीआयवरून 5 लाखांपर्यंत पाठवा
यूपीआयवरून आता पैसे पाठवण्याची मर्यादा वाढवली आहे. एक लाखाऐवजी आता 5 लाख रुपयांपर्यंत पैसे यूपीआयवरून पाठवता येऊ शकणार आहेत. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थामध्ये पैसे भरण्यासाठी ही मर्यादा वाढवली आहे, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. याआधी ही मर्यादा केवळ 1 लाख रुपयांपर्यंत होती.