
शेअर बाजारात आलेल्या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. बाजार उघडल्यापासून मार्केटमध्ये लाली पसरली होती. जवळपास प्रत्येक सेक्टरमध्ये पडझड दिसून आली.
शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 387 अंकांनी कोसळला आणि 82,626 वर क्लोज झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टी 96 अंकांनी खाली येऊन 25,327 पर्यंत पोहोचला. जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केल्याने बाजारावर दबाव होता. त्यात अमेरिकेने व्हिसा नियमांमध्ये बदल केल्याने आयटी क्षेत्रावर संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी मार्केटचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अर्थात तेजीला ब्रेक मिळाला असला तरी बाजारात आयपीओंची क्रेझ पहायला मिळत आहे. अनेक आयपीओ गुंतणुकीसाठी आणि लिस्टिंगसाठी तयार आहेत.
कोणते IPO होणार लिस्ट?
Solar world energy solutions – आयपीओच्या माध्यमातून 490 कोटी रुपये जमावण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. शेअरची किंमत 333 ते 351 दरम्यान आहे. 23 सप्टेंबर रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होईल, तर 25 सप्टेंबर रोजी बंद होईल.
Epack Prefab Technologies Limited – या कंपनीचे उद्दिष्ट बाजारातून 300 कोटी रुपये जमावण्याचे असून शेअर किंमत 194 ते 204 दरम्यान आहे. गुंतवणूकदार 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान या आयपीओसाठी अर्ज करू शकतात.
Anand Rathi Share and Stock Broker ltd – या कंपनीचे उद्दिष्ट 740 कोटी रुपये जमावण्याचे आहे. 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या काळात आयपीओ ओपन असणार असून शेअर किंमत 393 ते 414 दरम्यान आहे.
Seshasai Technologies – या कंपनीचा आयपीओ 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. शेअरची किंमत 402 ते 423 दरम्यान असून बाजारातून 480 कोटी रुपये जमावण्याचे उद्दिष्ट आहे.
Jaro Institute Of Technology Management And Research – शिक्षण क्षेत्रातील ही कंपनी 450 कोटींचा आयपीओ घेऊन आली आहे. शेअर किंमत 846 ते 890 दरम्यान असून 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान यासाठी अर्ज करता येईल.
Jain Resource Recycling Ltd – ही कंपनी 500 कोटींचा आयपीओ घेऊन आली आहे. शेअर किंमत 220 ते 232 दरम्यान आहे. 24 सप्टेंबर रोजी आयपीओ ओपन होईल आणि 26 सप्टेंबर पर्यंत यासाठी अर्ज करता येईल.
Ganesh Consumer Product Ltd – ही कंपनी IPO द्वारे 136 कोटी रुपये उभारत आहे. शेअरची किंमत 306 ते 322 दरम्यान असून हा IPO गुंतवणुकीसाठी 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान ओपन असेल.
Atlanta Electric ltd – बाजारातून 687 कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट या कंपनीचे आहे. या कंपनीचा IPO 22 ते 24 सप्टेंबर काळात गुंतवणूक करायला ओपन असणार आहे. शेअर किंमत 718 ते 754 दरम्यान ठेवण्यात आली आहे.
GK energy ltd – एनर्जी क्षेत्रातील या कंपनीने 400 कोटींच्या उभारणीसाठी IPO आणला असून याची किंमत 145-153 रुपयांदरम्यान आहे. 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर काळात यात गुंतवणूक करता येईल.
Saatvik Green Energy – सोलर एनर्जी क्षेत्रातील या कंपनीचा IPO 19 te 23 सप्टेंबर काळात गुंतवणुकीसाठी ओपन असणार आहे. 900 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी कंपनीने IPO आणला असून याची किंमत 442-465 दरम्यान आहे.
iValue Infosolutions – सायबर सुरक्षा क्षेत्रातील ही कंपनी IPO द्वारे 560 कोटी उभारत आहे. 18 ते 22 सप्टेंबर काळात यात गुंतवणूक करता येईल आणि शेअर किंमत 284-299 दरम्यान आहे.
Jinkushal Industries – कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील ही कंपनी IPO द्वारे 116 कोटी रुपये उभारत आहे. शेअरची किंमत 115-121 दरम्यान असून 25 सप्टेंबर रोजी हा IPO गुंतवणुकीसाठी ओपन होईल. 29 सप्टेंबर पर्यंत यात गुंतवणूक करण्याची संधी आहे.
DSM Fresh Food ltd – ही कंपनी IPO द्वारे 59 कोटी रुपये उभारत आहे. शेअर किंमत 96 ते 101 दरम्यान असून 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर काळात यात गुंतवणूक करता येईल.
(टीप – ही फक्त माहिती असून गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या)




























































