
व्हॉटस्अॅप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फिचर्स लाँच करत असते. नुकतेच व्हॉटस्अॅपने नवीन फिचर लाँच केले आहे. याद्वारे व्हॉटस्अॅपचे स्टेटस तुम्हाला थेट फेसबुकवर शेअर करता येणार आहे.
व्हॉटस्अॅपला माय स्टेटसवर गेल्यानंतर तीन डॉट्वर टॅप करावे लागेल. तेथे गेल्यावर शेयर टू फेसबुक स्टोरी असा पर्याय दिसणार आहे. त्यावर टच करून स्टेटस थेट फेसबुक स्टोरीवर शेयर करता येणार आहे. कंपनीने हे नवीन फिचर युजर्ससाठी जारी केले असले तरी यासंदर्भात कोणतीही माहिती कंपनीने दिलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून या फिचरची कंपनीकडून चाचपणी सुरू होती. हे अपडेट व्हॉटस्अॅप ऍण्ड्रॉईड व्हर्जन 2.19.258 वर हे अपडेट उपलब्ध झाले आहे.
या फोनवर व्हॉटस्अॅप झाले बंद
आयएसओ 8 या जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या आयफोन्सवर यापुढे व्हॉटस्अॅप वापरता येणार नाही. तसेच ऍण्ड्रॉईड 2.3.7 आणि त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर देखील यापुढे व्हॉटस्अॅप चालणार नाही. ज्या सिस्टीमसाठी व्हॉटस्अॅप बंद होणार आहे अशा सिस्टीममध्ये व्हॉटस्ऍप इन्स्टॉल असेल तर ते चालणार आहे. पण एकदा का ते अनइन्स्टॉल केले तर पुन्हा मग ते सुरू होणार नाही.
























































