शशी थरूर यांच्यासह सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत शेतकऱयांच्या परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारबाबत चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते-खासदार शशी थरूर यांच्यासह सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रक्टर परेडमध्ये एक ट्रक्टर उलटल्याने एका शेतकऱयाचा मृत्यू झाला होता. मात्र शशी थरूर यांच्यासह अनेकांनी सदर शेतकऱयाचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या गाळीबारात झाला असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. याची गंभीर दखल घेत सामाजिक तेढ निर्माण करणे, गुन्हेगारी षड्यंत्राला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवत नोएडा येथील पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मृणाल पांडे, राजदीप सरदेसाई, विनोद जोसे, जफर आगा, परेश नाथ, अनंत नाथ या सहा पत्रकारांचा समावेश आहे.