
कांदिवली पश्चिमेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयातील रुग्णांना आता दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. या रुग्णालयात रुग्णांना भेडसावणार्या विविध प्रश्नांसंदर्भात विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या पुढाकाराने नुकतीच आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या दालनात रुग्णालयाचे डीन आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत येथील समस्या लवकरात लवकर सोडवण्याबाबत चर्चा केली.
अमेय घोले यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत येथील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. रुग्णालयाचे डीन डॉ. आंग्रे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, नगरसेविका शुभदा गुढेकर, शाखाप्रमुख मनोज मोहिते, उपशाखाप्रमुख अजित मोगल यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

























































