
टीम इंडियाचा डावखुरा खेळाडू आणि गब्बर नावाने परिचित असणाऱ्या शिखर धवन याला सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिखर धवन याला ईडीने नोटीस पाठवत चौकशीला हजार राहण्याचे आदेश दिले आहे. याच प्रकरणात याआधी सुरेश रैना याचीही चौकशी झालेली आहे.
इडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवन याचे ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रमोशन याद्वारे या बेटिंग अॅपशी संबंध असल्याचा संशय आहे. त्याची सविस्तर चौकशी करून पैशांच्या व्यवहारांबाबत माहिती घेतली जाणार आहे.याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याची जवळपास 8 तास चौकशी करण्यात आली होती. तसेच गुगल आणि मेटाच्या प्रतिनिधींनाही अॅपच्या जाहिरातींबाबत माहिती घेण्यासाठी समन्स बजावले गेले होते.
1xBet betting case: ED begins questioning cricketer Shikhar Dhawan
Read @ANI Story | https://t.co/KIYvVov2G8#Shikhardhawan #ED pic.twitter.com/nU1TkKLU4o
— ANI Digital (@ani_digital) September 4, 2025
शिखर धवनची कारकिर्द
शिखर धवनने टीम इंडियासाठी ३४ टेस्ट, १६७ वनडे आणि ६८ टी२० सामने खेळले असून, त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७,००० हून अधिक धावा आहेत. IPL मध्ये तो पंजाब किंग्सचा कर्णधार राहिला होता. धवन क्रिकेटमधून जरी बाजूला गेला असला तरी जाहिराती आणि सोशल मीडियाद्वारे सक्रिय आहे.