शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, 60 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

बॉलीवूडची फिटनेस आयकॉन अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा सध्या प्रचंड चर्चेत असतात. आता दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा, राज कुंद्रा व्यतिरिक्त एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील जुहू पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री आणि तिच्या पतीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील एका व्यावसायिकाविरुद्ध 60.48 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण शिल्पा आणि राज यांच्या बंद पडलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडसाठी घेतलेले कर्ज आणि गुंतवणूक कराराशी संबंधित असल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय ?
उद्योगपती दीपक कोठारी यांनी शिल्पा आणि राज कुंद्रावर आरोप केले आहेत. या दोघांना 2015 ते 2023 च्या सुमारास व्यवसाय विस्तारासाठी त्यांना 60.48 कोटी रुपये दिले होते. परंतु त्यांनी ते वैयक्तिक खर्च म्हणून खर्च केले. तसेच 2015 मध्ये एजंट राजेश आर्य यांच्यामार्फत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या संपर्कात आले होते, असा दावाही दीपक कोठारी यांनी केला आहे.

अभिनेत्री शिल्पा आणि राज कुंद्रा त्यावेळी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म, बेस्ट डील टीव्हीचे संचालक होते. त्यामुळे शिल्पा शेट्टी यांच्याकडे कंपनीचे 87 टक्क्यांहून अधिक शेअर्स होते. त्याचवेळी राजेश आर्य यांनी कंपनीसाठी 12 टक्के वार्षिक व्याजदराने 75 कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. मात्र जास्त कर टाळण्यासाठी त्यांनी हे पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर एक बैठक झाली आणि पैसे वेळेवर परत केले जातील या आश्वासनासह करार ठरवण्यात आला होता, असा आरोप दीपक कोठारी यांनी केला आहे.

शिल्पाच्या वकिलाने काय सांगितले ?
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) मध्ये यावर आधीच निर्णय झाला आहे. या प्रकरणात कोणताही गुन्हेगारीपणा नाही आणि त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे EOW ला सादर केली आहेत, असा दावा वकिलाने केला आहे.

बाॅलीवूडमधला ‘हा’ आहे सर्वात महागडा घटस्फोट, वाचा सविस्तर