
पहिल्या प्रेमाची अव्यक्त गोष्ट घेऊन शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. नुकतेच या मालिकेचा टीझर लाँच झाला आहे.
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या गाजलेल्या मालिकेनंतर स्वप्नील जोशी पुन्हा एकदा तब्बल 10 वर्षांनी मालिकेत दिसणार आहे, तर ‘तुला पाहते रे’मध्ये राजनंदिनीची लक्षवेधी भूमिका निभावल्यानंतर शिल्पा तुळसकरने पुनरागमन केले आहे. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत स्वप्नील जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहेत.
स्वप्नीलने सांगितले, चाळीशी पार केलेल्या सौरभ – अनामिकाची ताजी आणि तरुण प्रेमकहाणी म्हणजेच ‘तू तेव्हा तशी’. प्रेम करायचे राहून गेले असे म्हणणाऱया प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी, तर प्रेमात असणाऱयांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी अशी ही मालिका आहे.





























































