शिंदे गटाच्या उमेदवार मिनाक्षी शिंदे यांची तरुणाला शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

शिंदे गटाच्या उमेदवार, ठाण्याच्या महिला जिल्हा प्रमुख व माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे या तरुणाला शिवीगाळ करताना तसेच आग्री समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्य करताना ऐकायला मिळतंय. ही ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यातील भाषा ही अत्यंत आक्षेपार्ह आहे.