मोठी बातमी – गंगा नदीत मालवाहू जहाज बुडाले, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

झारखंडमधील साहिबगंज येथे मोठी दुर्घटना झाली आहे. राजमहल ते मालदा दरम्यान एक मालवाहू जहाज दुर्घटनाग्रस्त झाले असून गंगा नदीत बुडाले आहे. या जहाजावर दगडांनी भरलेले 8 ट्रक होते आणि हे सर्वही पाण्यात बुडाले असून जहाजावरील अनेक जण बेपत्ता आहेत. या सर्वांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता आहे.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, साहिबगंज जिल्ह्यातील राजमहल येथून दगडांनी भरलेले ट्रक घेऊन एक मालवाहू जहाज पश्चिम बंगालकडे निघाले होते. मात्र पश्चिम बंगालमधील मानिकचक घाटजवळ जहाज दुर्घटनाग्रस्त झाले. गंगा नदीत जहाजाला जलसमाधी मिळाली असून यातील सर्व लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी हे जहाज दुर्घटनाग्रस्त झाले. लोडिंग दरम्यान हा अपघात झाला असून जहाजावरील ट्रकही पाण्यात बुडाले आहेत. जहाजाचे चालक आणि खलाशीही पाण्यात बुडाले असून घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाने धाव घेतली आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या