शिर्डी साई मंदिरात दर्शन मर्यादा वाढवली, दर दिवसाला 12000 भक्तांना मिळणार साईदर्शन

shirdi-trust

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात आता दररोज बारा हजार भक्तांना दर्शन मिळणार आहेत. 8 हजार भाविकांना ऑनलाईन फ्रि पास दिले जाणार आहेत तर चार हजार भाविकांना पेड पासद्वारे दर्शन मिळेल. शिर्डी साई मंदिर संस्थान प्रशासनाने ही घोषणा केली आहे.

लॉकडाऊनमध्ये मंदिर उघडल्यानंतर दररोज सहा हजार भाविकांना दर्शन दिले जात होते. मात्र आता नाताळच्या सुट्टीच्या पार्श्वभुमीवर साईसंस्थानने मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या भक्तांनी ऑनलाईन दर्शन बुकींग करावं असे आवाहन साई संस्थानने केली आहे.

दरवर्षी शिर्डीचे साई मंदिर हे 31 डिसेंबरला संपूर्ण रात्र सुरू राहते. मात्र यंदा मंदिर सुरू ठेवणार की नाही याबाबत शिर्डी साई मंदिर संस्थानांने काहीच निर्णय घेतला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या