
दिवाळीच्या सणानिमित्ताने सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे शिर्डी आणि शनिशिंगणापुरात भाविकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. श्री साईबाबा आणि श्री शनैश्वरांच्या मंदिरांकडे येणारे सर्वच रस्ते भाविकांची गर्दी आणि वाहनांमुळे हाऊसफुल्ल झाले होते.
दीपावलीच्या सणाला जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे शिर्डी आणि शनिशिंगणापुरातील भाविकांच्या गर्दीत वाढ झाली आहे. शनिशिंगणापुरात मंदिराकडे येणारे रस्ते फुलून गेले आहेत. महाद्वारपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या असून, शनिमहाराजांच्या चौथऱयाजवळ वाढलेल्या गर्दीतील रेटारेटीने मोठा गोंधळ उडत होता. अभिषेक भवनात अभिषेक घालण्यासाठी गर्दी दिसून येत होती. गर्दीसमोर देवस्थानचे सुरक्षा रक्षक व पोलीसही हतबल झाल्याचे चित्र होते.































































