शिर्डी-तिरुपती विमानसेवा, 29 मार्चपासून सुरू होणार; स्पाइसजेट सुरू करणार सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिर्डी विमानतळावरून 29 मार्चपासून शिर्डी-तिरुपती विमानसेवा सुरू होणार आहे. दोन महत्त्वाची देवस्थाने विमानसेवेने जोडली जाणार असल्याने याचा फायदा भाविकांना होणार आहे.

तिरुपतीवरून दुपारी दोन
वाजता हे विमान निघेल व 3.45 वाजता हे विमान शिर्डी विमानतळावर पोहचेल. चार वाजता हे विमान पुन्हा शिर्डीवरून निघेल व 5.20 वाजता तिरुपतीला पोहचणार आहे. सुरुवातीला मंगळवार, गुरुवार व शनिवारी ही विमानसेवा पुरविली जाणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात ही विमानसेवा वाढविण्याचा विमानतळ विकास प्राधिकरणाचा प्रयत्न असणार आहे.

शिर्डी-तिरुपतीसाठी पाच हजारांच्या आसपास भाडे असणार आहे. आंध्र प्रदेशातून साईदर्शनासाठी शिर्डीत येणाऱया भाविकांची संख्या व महाराष्ट्रातून तिरुपती बालाजीला जाणाऱया भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विमानसेवेस चांगला प्रतिसाद मिळू शकतो. अनेक दिवसांपासून भक्तांची ही विमानसेवा सुरू करण्याची मागणी होती.