शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या, 4 करडे ठार

2

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची दहशत कायम असून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बेट भागातील जांबूतला 8 शेळ्या व 4 करडे बिबट्यांच्या हल्ल्यात ठार झाली आहेत. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जांबुत ता.शिरूर येथील संजय सोनूले हे शेळ्यापालना बरोबरच इस्री व्यवसाय करून कुटुंबाची गुजराण करीत आहेत. त्यांच्याच 4 शेळ्या व 4 करड्यांना बिबट्याने ठार केले आहे. वनविभागाने त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची तसेच वनविभागाने बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनपाल चारूशीला काटे व वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.