
गरजू आणि गरीबांसाठी शिवसेनेने जाहीर केलेल्या शिवभोजन थाळीची शिवसेना नेते माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याहस्ते मंगळवारी सुरुवात करण्यात आला. शासनाच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी शिवजयंतीनिमित्त शिवभोजन थाळीची सुरुवात करण्यात आला असून मंगळवारी बीड बसस्थानकासमोर गर्दीच्या ठिकाणी गरीब आणि गरजूसाठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याहस्ते या थाळीची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रूग्णालय, बसस्थानक, रेल्वे परिसर, बाजार पेठ, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी दुवारी 12 ते 2 यावेळेत शिवभोजन सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक कुंडलिक खांडे, अरूण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, गोरख शिंगण, नानासाहेब काकडे, अरूण बोंगाणे, राहूल गुरखुदे यांच्यासह शिवसैनिक, परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































































