
शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेल्या ईडी सरकारने गोरगरीबांच्या तोंडचा घास काढण्याचा घाट घातला आहे. दहा रुपयांत मिळणाऱ्या शिवभोजन केंद्रचालकांचे तीन महिन्यांचे अनुदान लटकवण्यात आले आहे. जुलै महिन्यापासून शिवभोजन थाळीचे अनुदान न मिळाल्यामुळे केंद्रचालक अडचणीत आले आहेत. ईडी सरकारच्या या खोडसाळ कारभाराचा नवी मुंबईतील सात तर ठाणे जिल्ह्यातील 60 केंद्रचालकांना मोठा फटका बसला आहे.
राज्यात शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवभोजन थाळी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्या अंतर्गत गरजूंना दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळत आहे. या प्रत्येक थाळीवर अन्न पुरवठा विभागाकडून 40 रुपयांचे अनुदान मिळते. राज्यात महाविकास आहेत. आघाडी सरकार सत्तेत असताना हे अनुदान 15 दिवसांत निघत होते. त्यामध्ये कोणताही विलंब होत नव्हता. मात्र ईडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवभोजन थाळीच्या
अनुदानाची लटकंती सुरू झाली आहे. जुलै महिन्यातील 15 दिवसांचे आंदोलन काढण्यात आल्यानंतर पुढील अनुदान अर्धा ऑक्टोबर संपत आला तरी अजून निघाले नाही. त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्या चालकांच्या अडचणी वाढल्या
नवी मुंबईत दिघ्यापासून ते बेलापूरपर्यंत सात केंद्रांवर शिवभोजन थाळी मिळते. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवभोजन थाळीची एकूण 60 केंद्रे आहेत. सर्वच केंद्रांवर शिवभोजन
पाठपुराव्यांची दखल नाही
ठाणे जिल्ह्यात शिवभोजन थाळीची सुमारे 60 केंद्रे आहेत. या सर्वच केंद्रांवर प्रत्येक 100 ते 150 थाळ्या वितरित केल्या जातात. प्रत्येक थाळीच्या मागे 40 रुपये अनुदान दिले जाते. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे सर्वच केंद्रांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान थकले आहे. ते मिळवण्यासाठी केंद्रचालक नियमित पाठपुरावा करीत असले तरी शासकीय पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही.
कोरोनात मोठा आधार
कोरोना महामारीत सर्वच ठप्प होते. त्यावेळी शिवभोजन केंद्रांचा सर्वसामान्यांना मोठा आधार मिळाला होता. लॉकडाऊनमध्ये मोठमोठे हॉटेल बंद झाले असले तरी शासनाने शिवभोजन थाळी केंद्र चालूच ठेवली होती. त्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना या केंद्रांच्या माध्यमातून दोन घास मिळाले होते. कोरोना महामारीत या केंद्रांची चांगली मदत झाल्यामुळे सर्वच स्तरांतून या योजनेचे कौतुक केले होते. मात्र आता त्याच शिवभोजन थाळीचे अनुदान लटकवल्यामुळे केंद्रचालकांमध्ये नाराजी पसरली आहे..
थाळीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. बहुतेक केंद्रांवर तास ते दोन तासांत सर्व थाळ्या संपल्या जातात. नवी मुंबईतील सर्वच शिवभोजन थाळीच्या केंद्रांवर गरजू नागरिकांची मोठी गर्दी असते. एपीएमसी मार्केटमध्ये सुरू असलेल्या शिवभोजन थाळी केंद्राला विक्रमी प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता अनुदान लटकल्यामुळे शिवभोजन थाळी केंद्र कसे चालवायचे, असा प्रश्न चालकांसमोर उभा ठाकला आहे.

























































