
सामना प्रतिनिधी । वडवणी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उप जिल्हा संघटक तथा व महाराष्ट्र राज्य ओतारी समाज महिला प्रतिनिधी प्रमिला माळी (ओतारी) यांच्या प्रयत्नाने एकावन्न नोंदणीकृत इमारत बांधकाम लाभार्थ्यांना शुक्रवारी वडवणीत बांधकाम साहित्यासह पेट्या वाटप करण्यात आल्या.
वडवणी येथील रहिवासी असणाऱ्या प्रमिला माळी यांनी मागील वीस वर्षापासून शिवसेनेतून कार्य करतानाच सामाजिक कार्यात ठसा उमटविला आहे.































































