प्रताप जाधव यांचे आकस्मिक निधन

शिवसेनेचे शाखाप्रमुख व बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांचे चिरंजीव प्रताप जाधव यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रताप जाधव हे मुंबई महापालिकेच्या सेवेत होते. पक्षाच्या कामातही ते सक्रिय होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संपर्क साधून जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. स्थानिक आमदार संजय पोतनीस यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिकांनी भेटून व फोनद्वारे जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले.