महाडमध्ये शिवसेना करणार 30 हजार पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

महाडमध्ये शिवसेनेच्या विजयाची हॅटट्रीक होणारच. पहिल्या निवडणुकीत 14 हजारांची आघाडी मिळाली. दुसऱयांदा 21 हजारांचे मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत 30 हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार भरत गोगावले विक्रमी मतांनी विजयी होणारच, असा निर्धार मुस्लिम समाजाने केला.मुस्लिमांच्या विविध संघटनांनी शिवसेनेला जाहीरपणे आपले समर्थन दिले असून धनुष्यबाणच विकास करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोगावले यांच्या प्रचारासाठी आज  चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रांगणात मुस्लिमांच्या संघटनांचा मेळावा आयोजित केला होता. मुस्लिमबांधवांचे शिवसेनेबरोबर विश्वासाचे नाते असून ते यापुढेही कायम राहील, असा विश्वास गोगावले यांनी केला.  याप्रसंगी शिकसेनेचे इकबाल चांदले, शोएब पाचकर, सुलतान मुकादम, बशीर चिचकर, अकबर तरे, मुक्तार तरे, अख्तर पठाण,  इम्रान पठाण, फैजल चांदले, अफजल चांदले, इकबाल माटकणकर, जितेंद्र साकंत, किरोधी पक्षनेते दीपक साकंत, सुनील अग्रकाल, शहरप्रमुख नितीन पाकले उपस्थित होते.