
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 1, 7 आणि 12 मधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग क्र. 1 मधील पदाधिकारी
उपविभाग संघटक – दर्शना भरणे (शाखा क्र. 2, 6), विधानसभा समन्वयक – स्नेहा सावंत (शाखा क्र, 2, 6), शाखा संघटक – शैला गंगावणे (शाखा क्र. 6), शाखा समन्वयक – नीता चित्ते (शाखा क्र. 6).
विभाग क्र. 7 मधील पदाधिकारी
विधानसभाप्रमुख – सिद्धी जाधव (विक्रोळी विधानसभा), नंदिनी सावंत (मुलुंड विधानसभा), सुनंदा वाफारे (भांडुप विधानसभा), प्रशासकीय कार्यालयप्रमुख – प्रिया हळदणकर (विक्रोळी विधानसभा), नीता मोरे (मुलुंड विधानसभा), जयश्री चौधरी (भांडुप विधानसभा).
विभाग क्र. 12 मधील पदाधिकारी
शाखा संघटक – रिया चेंदवणकर (शाखा क्र. 217), सहसमन्वयक – रुपाली बुरमेकर (शाखा क्र. 217).



























































