शिवसेनेची बाजू सत्याची; अरविंद सावंत देणार मंत्रिपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind-sawant-in-delhi

राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देऊनही भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी सरकार बनविण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी सरकार स्थापण्यासाठी शिवसेनेला आमंत्रण दिले आहे. यानंतर शिवसेनेकडून सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील ठाम भूमिका घेत केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘शिवसेनेची बाजू सत्याची आहे. मग अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?’ असा सवाल करत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी ही घोषणा केली आहे.

आपण राजीनामा देण्यामागे काय कारण आहे हे देखील अरविंद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ‘लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे… शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?’ असा सवाल करत मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.