मर्डे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, सरपंच पदासह सहा सदस्य विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय अशी लक्षवेधी लढत झालेल्या मर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास आघाडीने विरोधकांचा धुव्वा उडवत शिवसेनेचा झेंडा फडकवला. शिवसेनेचे संदीप हडकर 254 मताधिक्याने विजयी झाले. तर 11 पैकी 6 सदस्यही विजयी ठरले.

कर्जत तालुक्यात शिवसेनेचा झंझावात, 17 पैकी 13 जागांवर महायुतीची मुसंडी

महाडच्या चोचिंदे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला

तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या मसुरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेल्या मर्डे ग्रामपंचायत साठी 31 ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. तर विभाजनातील देऊळवाडा व बिळवस या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. मर्डे ग्रामपंचायतीची मतमोजणी मंगळवारी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुहास खडपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मर्डे ग्रामपंचायत 11 सदस्यापैकी 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात सर्वपक्षीय गावविकास आघाडी 4 व शिवसेना पुरस्कृत 1 जागा बिनविरोध होती. सरपंच व 6 सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवला. पूर्वी मसुरे ग्रामपंचायत स्वाभिमान पक्षाच्या ताब्यात होती. आता गावविकास पॅनलला भाजप, स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा होता.

आमदारांच्या उपस्थितीत जल्लोष
मर्डे ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या विजयानंतर आमदार वैभव नाईक मालवणात दाखल झाले. शिवसेना शाखा येथे सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत जल्लोष करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, छोटू ठाकूर, गोपी पालव, मसुरे विभागप्रमुख पराग खोत, बंड्या खोत, तपस्वी मयेकर, दीपक देसाई, स्वप्नील आचरेकर यासह अन्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.