युती 100 टक्के होणार!

chandrakant-patil

राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचा फॉर्म्युला नक्की करण्याची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. फॉर्म्युला करण्यावर काम सुरू आहे. जेव्हा फॉर्म्युला अंतिम होईल तेव्हा पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला जाईल. पण शिवसेना-भाजप युती होणार हे शंभर टक्के, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यालयात दिवसभर बैठका सुरू होत्या. त्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.

युतीची घोषणा पत्रकार परिषदेत

युतीची चर्चा जागावाटपावर अडली आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता ते म्हणाले की, असे काही निश्चित झालेले नाही. पण जागावाटपाचा निर्णय अंतिम झाल्यावर महायुतीचे हे दोन्ही नेते त्याची घोषणा करतील.

पितृपंधरवडय़ाचा प्रश्न नाही

पितृपंधरवडा असल्याने युतीची घोषणा होत नाही याकडे चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सध्या ज्या प्रकारचे वेगवान आयुष्य झाले आहे. त्यामध्ये पितृपंधरवडा नावाच्या संकल्पनेवर विश्वास जरी असला तरी व्यावहारिकदृष्टय़ा ते शक्य नसते. त्यामुळे पितृपंधरवडय़ानंतर करणार की आधी करणार हे अंतिम एकमत झाल्यावर ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या