
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी शहरात झंझावाती प्रचार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना महायुतीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली असून शहरात सर्वच ठिकाणी मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्र.5 येथून भव्य प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. भर उन्हात सराफ बाजार शिवाजी रोड पांडे गल्ली मुंबादेवी दर्शन असा संपूर्ण शहर भर उन्हात पिंजून काढले.
सदर प्रचार फेरीस संपर्कप्रमुख नरेंद्र दराडे, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, प्रमोद लबडे, शहरप्रमुख सनी वाघ, शिवसेनेचे नितीन औताडे, पराग संधान, भाजपा तालुकाप्रमुख शरद थोरात, शहरप्रमुख कैलास खैरे, गटनेते योगेश बागुल, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री शिवाजीराव ठाकरे, भाजपा शहराध्यक्ष श्री कैलास खैरे, शिवसेना शहराध्यक्ष श्री सनीभाऊ वाघ, यासह शिवसेना-भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक,कार्यकर्ते उपस्थित होते.

























































