शिवसेनेचे बोरिवलीचे उपविभागप्रमुख उत्तम बारबोले यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे बोरिवली विधानसभा उपविभागप्रमुख व माढा विधानसभा संपर्कप्रमुख उत्तम बारबोले यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी छाया बारबोले, दोन मुली भूमी व उद्वा तसेच तीन बहिणी असा परिवार आहे. उत्तम बारबोले यांच्या निधनामुळे निष्ठावंत शिवसैनिक हरपला, अशी हळहळ व्यक्त होत आहे.

एकनिष्ठ शिवसैनिक, मनमिळावू व्यक्तिमत्त्व आणि उत्तम वक्ते अशी उत्तम बारबोले यांची ओळख होती. मंगळवारी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जाण्यासाठी बसमधून निघत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शिवसैनिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे पार्थिव बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामुणकर, संजय भोसले, नगरसेवक सारिका झोरे, धर्मेंद्र काळे, विभाग समन्वयक सुजाता शिंगाडे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन शोक व्यक्त केला. माढा तालुक्यातील घोटी या मूळ गावी उत्तम बारबोले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.