जे जे शक्य होईल ते ते करणारच – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackrey-interview

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. सरकार स्थापनेची गाडी अडलेलीच आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुरुवारी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना जे जे शक्य होईल ते सर्व करणार असल्याचे सूचक विधान केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिलेला असला तरी सत्तेचे वाटप कशा प्रकारे होणार याबाबत भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आलेला नाही. तसेच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ठरलेल्या ‘फिफ्टी- फिफ्टी’च्या फॉर्म्युल्याचे काय? याबाबत स्पष्टता आणलेली नाही. यामुळे राज्यात सत्तास्थापनेवरून पेच निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक गुरुवारी शिवसेना भवनमध्ये बोलविण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या जागावाटपावेळी तुमची अडचण समजून घेतली. आता मात्र अधिक अडचणी समजून घेता येणार नाहीत. जे मागे ठरले आहे त्याप्रमाणेच सत्तावाटप व्हायला हवे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना भवनात 12 वाजता बैठक

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत शिवसेना काय भूमिका घेते याकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने आज विधिमंडळ नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार, समर्थक प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष आमदारांची बैठक उद्या गुरुवारी शिवसेना भवन येथे दुपारी 12 वाजता पार पडेल. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ नेत्याची निवड करून घोषणा करण्यात येईल.

सामना अग्रलेख – पेच आणि चक्रव्यूह  आम्हाला पर्वा नाही!