दक्षिण-मध्य मुंबईतील रखडलेले एसआरए प्रकल्प मार्गी लावा, शिवसेनेची एसआरएकडे मागणी

दक्षिण-मध्य मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून सर्वसामान्य रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.

दक्षिण-मध्य मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांबाबत शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विधानसभा संघटक विठ्ठल पवार, उपविभागप्रमुख राजेश पुचिक, समन्वयक संदीप गुरव, सुरेश शितप, निरीक्षक शिवाजी गावडे, स्वाभिमान रिपब्लिकन पार्टीचे सागर संसारे, अनिल कदम, शाखाप्रमुख सतीश कटके, सचिन खेडेकर, उपविभाग अधिकारी रूपेश मढवी यांच्यासह स्थानिक नागरिक, गृहनिर्माण संस्थांचे सदस्य उपस्थित होते.