शिवसेनेतर्फे गणेशभक्तांना पाणी, सरबत वाटप

अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेनेने दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले होते. ठिकठिकाणी स्टॉल लावत शिवसैनिकांनी भक्तांना मोफत अल्पोपहार, सरबत, आईस्क्रीम आणि पाणी वाटप केले. या उपक्रमामुळे व सेवाकार्यामुळे गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत शिवसैनिकांचे आभार मानले.

 

 

शिवसेना शाखा क्रमांक 215 व जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने गणेश भक्तांसाठी मोफत बिस्लरी पाणीचे वाटप करण्यात आले. शिवसेना उपनेते, सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, मलबार हिल विधानसभा प्रमुख अरुंधती दुधवडकर, युवासेना उपसचिव हेमंत दुधवडकर यांच्या हस्ते पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या. या लोकोपयोगी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, दक्षिण मुंबई समन्वयक सुरेखा(माई) परब, मलबार हिल समन्वयक शिवाजी रहाणे, उपविभाग प्रमुख सुजित राणे  विधानसभा संघटक सुरेखा उबाळे, उपविभाग संघटिका वर्षा साबळे, समन्वयक यशोदा कोटियन, शाखा संघटिका सुप्रिया शेडेकर, मीना आंधळे, सह समन्वयक नंदा शेलार व इतर शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्रमांक 10 च्या वतीने लोकमान्य टिळक मार्ग बोरिवली (पश्चिम) येथे अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनासाठी येणाऱया भक्तांसाठी विनामूल्य सरबत, पाणी वाटप करण्यात आले तसेच विविध गणेशोत्सव मंडळांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणेशोत्सव मंडळांना माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपविभाग प्रमुख विनायक सामंत, शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, शाखासंघटक शिल्पा पितळे, शाखासमन्वयक सूर्यकांत निर्मळ, अश्विनी पाटील, शाखाप्रमुख एडविन बंगेरा, जयश्री बंगेरा, स्नेहल पालांडे कार्यालयप्रमुख देवेंद्र आंबेकर, ओमकार खांडेकर, उद्योजक संजय खत्री व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.