
सामना प्रतिनिधी । पुणे
मुठा कालव्याची भींत उंदीर आणि घुशी यांनी पोखरल्यामुळे कालवा फुटल्याचा शोध पाटबांधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी लावला आहे. या ठिकाणी बेकायदेशीरपणे वीज विभाग आणि खाजगी कंपन्यांच्या वायर टाकण्यात आल्या आहेत. आता अधिकाऱ्यांनी यातील उंदीर आणि घुशी कोण आहेत याचा शोध लावावा, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली.
पुणे : मुलांच्या शिक्षणाचे पैसे गेले वाहून, मदतीसाठी शिवसेना आली धावून
खडकवासला धरणाचा कालवा काल फुटल्यामुळे दांडेकर पूल परिसरातील शेकडो घरांचे नुकसान झाले. आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही टीका केली.
ऊंदीर, घूस आणि खेकड्यांमुळे फुटला मुठा कालवा! जलसंपदा मंत्र्यांचे विधान
आमदार डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे अनाथ आहे. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करणे आवश्यक होते. मात्र, पुणे महापालिकेतील आजी आणि माजी सत्ताधाऱ्यांनी ते केल्याचे दिसत नाही. पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिका या दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्याने हा प्रकार घडला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. यंत्रणांनी त्यानंतर काम करणे आवश्यक होते. लोकांच्या जीवावर बेतेपर्यंत शासन शांत बसणार का? असा सवालही त्यांनी केला.





























































